ग्रामपंचायत पुनतगाव ता.नेवासा जि.अहिल्यानगर
प्रमाणपत्र
प्रमाणित करण्यात येते कि,ग्रामपंचायत पुनतगाव या कार्यालयाची केंद्र शासनाच्या माहितीचा अधिकार अधिनियम-२००५,कलम ४(१)(ख) अन्वये प्रसिद्ध करावयाची १ ते १७ बाबीची माहिती अद्ययावत असल्याची खात्री करण्यात येत आहे.सदर माहिती मंजूर करून ती नोटीस बोर्डवर प्रसिद्ध करण्यास मान्यता देण्यात येत आहे.
दिनांक- ०१/०७/२०२५ कार्यालय प्रमुख
नाव- श्री.मोटे सतीश दौलतराव
पदनाम-ग्रामपंचायत अधिकारी
कार्यालयाचे-ग्रा.प.पुनतगाव
ग्रामपंचायत पुनतगाव ता.नेवासा जि.अहिल्यानगर
माहिती अधिकार अधिनियम २००५ अन्वये माहीती
ग्रामपंचायत पुनतगाव ता.नेवासा जि. अहिल्यानगर
केंद्ग शासनाचा माहितीचा अधिकार अधिनियम २००५ कलम ४(१) नमुना ब नुसार १७ बाबींवर प्रसिध्द करावयाची ग्रामपंचायत पुनतगाव ची माहिती खालीलप्रमाणे आहे.
कलम २(ह) नमुना(अ)
माहिती अधिकार अधिनियम २००५ अन्वये लोकप्राधिकार यांची यादी
| अ.क्र | लोकप्राधिकारी संस्था | संस्था प्रमुखाचे नाव | ठिकाण पत्ता |
| १ | ग्रामपंचायत पुनतगाव ता.नेवासा जि. अहिल्यानगर | सरपंच ग्रामपंचायत पुनतगाव | ग्रामपंचायत पुनतगाव ता.नेवासा जि. अहिल्यानगर |
| २ | ग्रामपंचायत अधिकारी |
कलम४(१) (ख)१
ग्रामपंचायत पुनतगाव ता.नेवासा जि. अहिल्यानगर या संस्थेतील कामांचा व कर्तव्यांचा तपशिल
| अ.क्र. | तपशिल | माहिती |
| १ | कार्यालयाचे नाव | ग्रामपंचायत पुनतगाव ता.नेवासा जि. अहिल्यानगर |
| २ | पत्ता | ग्रामपंचायत पुनतगाव ता.नेवासा जि. अहिल्यानगर |
| ३ | कार्यालय प्रमुख | ग्रामपंचायत अधिकारी ग्रामपंचायत पुनतगाव |
| ४ | कार्यालयीन दुरध्वनी क्रमांक व कार्यालयाची वेळ | मो.नं- – सकाळी-१०.०० ते दुपारी २.०० दुपारी २.३० ते सायकांळी ६.०० |
| ५ | साप्ताहिक सुट्टी व विशिष्ट विभागासाठी ठरविलेल्या वेळा | साप्ताहिक सुट्टीः महिन्याचा शनिवार व रविवार , सर्व शासकीय सुट्टया |
| ६ | शासकिय विभागाचे नांव | ग्रामपंचायत पुनतगाव |
| ७ | कोणत्या मंत्रालयीन खात्याच्या अधिनस्त | जिल्हा परिषद व पंचायत समिती नेवासा |
| ८ | कार्यक्षेत्र | ग्रामपंचायत पुनतगाव ता.नेवासा जि. अहिल्यानगर |
| ९ | विशिष्ट कार्ये | गावातीलल नागरिकांच्या आरोग्य व मुलभुत सोयी सुविधा पुरविणे |
| १० | विभागाचे ध्येय धोरण | गावातील लोकांचे आरोग्य व मुलभुत सुविधा पुरविणे |
| ११ | धोरण | स्वच्छ व सुंदर ग्रामपंचायत |
| १२ | सर्व संबंधित कर्मचारी | सर्व विभागाचे विभागप्रमुख |
| १३ | कार्ये | शासनाकडिल प्राप्त झालेल्या निधीचा विनियेग करणे . ग्रामपंचायत निधीचा गावामध्ये सुविधांकरिता वापर करणे,मालमत्ता व इतर करांची रक्कम जमा करणे |
| १४ | कामाचे विस्तृत स्वरुप | |
| १५ | मालमत्तचा तरशिल | माहिती |
| १६ | उपलब्ध सेवा | |
| १७ | संस्थेचा संरचना तक्ता | खालील यादिप्रमाणे |
कलम ४(१) (ख) (एक)
नमुना अ
ग्रामपंचायत अधिकारी यांच्या अधिकारांचा तपशिल
| अ.क्र | पदनाम | आर्थिक अधिकार | प्रशासकिय अधिकार | कोणत्या कायदा/नियम/शासकिय निर्णय परिपक्षकानुसार | अभिप्राय |
| १ | ग्रामपंचायत अधिकारी | १.विकास कामांची माहिती देणे २.कायदा व नियमानुसार कौन्सिलला मार्गदर्शन करणे ३.मिळकतींना कर आकारणी करणे. ४.कर्मचार्याना कलम ६१ अन्वये कर्मचारी नियंत्रण ५.जि.प.व प.स.नेवासा धोरणात्मक निर्णयासाठी शिफारस करणे. ६. धोरणात्मक निर्णयाची ग्रामपंचायत मध्ये माहिती सांगणे. ७. शासन निर्णयाची अंमलबजावणी करणे. ८.ग्रामपंचायत अधिनियम १९६१ कलम अन्ये कार्यवाही करणे. | शासन स्तर वरुन येणारे आदेशाचे पालन करणे व महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८ अन्वये कामकाज करणे. | मुंबई ग्रामपंचायत अधिनियमानुसार व शासन परिपत्रकानुसार |
कलम ४(१) (ख) (एक)
नमुना अ
ग्रामपंचायत अधिकारी यांच्या अधिकारांचा तपशिल
| अ.क्र | पदनाम | आर्थिक अधिकार | प्रशासकिय अधिकार | कोणत्या कायदा/नियम/शासकिय निर्णय परिपक्षकानुसार | अभिप्राय |
| १ | ग्रामपंचायत अधिकारी | श्री.मोटे सतीश दौलतराव | पोटकिर्द खतविणे,कर्मचारी सेवा पुस्तक अद्ययावत ठेवणे ,मासिक वेतन, कपाती करणे. | मुंबई ग्रामपंचायत अधिनियम १९५८ अधिनियमानुसार | |
| मालमत्तांची कर आकारणी करणे. मालमत्ता फेरफार आकारणी करणे वसुली कर्मचार्यामार्फत मालमत्ता करांची बिले पाठविणे व इतर करांची वसुली करणे पाणीपट्टी बिले पाठविणे व वसुली करणे विभागाशी संबंधित पत्रव्यवहार पाहणे. | मुंबई ग्रामपंचायत अधिनियम १९५८ अधिनियमानुसार |
ग्रामपंचायत पुनतगाव सर्वसाधारण रचना
| ग्रामसभा |
| महिला सभा |
| विशेष सभा |
| मासिक सभा |
| सर्वसाधारण सभा |
ग्रामपंचायत मध्ये निर्णय प्रक्रियेतील पर्यवेक्षण व जबाबदारीचे उत्तरदायित्व निश्चित करुन कार्यपध्दतीचे प्रकाशन
विभागाचे नाव : ग्रामीण विकास विभाग
विभाग प्रमुख :- जिल्हा परिषद व पंचायत समिती
- विभागामार्फत देण्यात येणारे परवाने व दाखले :- १) रहिवास वापर दाखला २) विद्युत कनेक्शन नाहरकत दाखला ३) व्यवसाय नाहरकत दाखला
- गावठाण बांधकाम परवानगी ग्रामपंचायतीला व नकाशे मंजुर नगररचना विभाग
अकृषिक वापर नाहरकत दाखला : बांधकाम परवानगी घेणेपुर्वी ज्या भुखंडात बांधकाम करावयाचे आहे असा प्रत्येक भुखंड बिनशेती असणे आवश्यक आहे. बिनशेती रहिवास वापर, वाणिज्य वापर(एकत्र) अशा पध्दतीने मा.जिल्हाधिकारी,पुणे यांचे कार्यालयामार्फत दिली जाते. त्यांचे कार्यालयाकडे बिनशेतीसाठी अर्ज सादर करतांना
३)व्यवसाय नाहरकत दाखला : ग्रामपंचायतीतील हद्दीतील कोणत्याही ठिकाणी कोणत्याही प्रकारचा व्यवसाय सुरु करावयाचा झालेस त्यासाठी ग्रामपंचायत मधुन अर्ज घेणे आवश्यक आहे. अर्जात नमुद केले प्रमाणे अर्ज भरुन देणे स्वतःची मिळकत धारक असेल तर मिळकत नंबर टाकणे. व भाडेकराराने असेल तर भाडेकरार अर्जा बरोबर देणे.
| अ.क्र. | कामाचे स्वरुप | अर्जासोबत जोडावयाची कागदपत्रे | आकारणेत येणारी फी |
| १ | इमारत बांधकाम परवानगी | विहित नमुन्यातील अर्ज-गावठाण हद्दीमधीलसिटिसर्व्हेकडील प्रॉपर्टी कार्डाचा उतारा प्रत सिटिसर्व्हेकडील जागेचा नकाशा लगतचे हिश्श्यासह मुळ प्रत व छायाकिंत प्रती | |
| २ | रहिवास वापर दाखला व विज कनेक्शन नाहरकत दाखला | १)नमुना नं.८ वर मिळकत नोंद २) रेशनकार्ड झेरॉक्स | |
| ३ | व्यवसाय नाहरकत दाखला | नमुना नं.८ उताराघरपट्टी पावती झेरॉक्स प्रत जागा मालकाचे रजिस्टर/नोटराईज्ड समंतीपत्र |
विभागाचे नांव : – पाणीपुरवठा विभाग
विभागप्रमुख : ग्रामविकास अधिकारी
- पाणीपुरवठा विभागामार्फत करणेत येणारी कामे : १) नविन नळ कनेक्शन देणे २) नळ कनेक्शन पाईपलाईन दुरुस्ती करणे ३) नविन पाईप लाईन टाकणे
- नविन नळ कनेक्शन देणे : विहित नमुन्यातील अर्ज व सोबतची कागदपत्रे सादर केल्यावर पाणीपुरवठा कर्मचारी मार्फत अहवाल घेऊन नळ कनेक्शन डिपॉझिट भरुन घेणे व नंतर नियमाप्रमाणे कनेक्शन देणे.
- नळकनेक्शन व पाईपलाईनची दुरुस्ती करणे : ग्रामपंचायत हद्दीतील पाईपलाईन दुरुस्तीसाठी सरपंच व ग्रामविकास अधिकारी यांची परवानगी घेऊन स्थळ पाहणी करुन पाणीपुरवठा कर्मचारी मार्फत दुरुस्ती करुन घेणे.
नविन पाईप(मुख्य) लाईन टाकणे : ग्रामपंचायत हद्दीतील नागरीकांच्या सोईसाठी सर्व्हे करुन आवश्यक तेथे नविन मुख्य पाईपलाईन टाकणेसाठी मासिक सभेमध्ये ठराव करणे. याबाबत नागरीक व सन्माननीय सदस्य यांचे मागणी नुसारही आवश्यक तेथे नविन पाईपलाईन टाकणेसाठी ठराव घेणे. त्यांचे अंदाजपत्रक मिळणेसाठी जिल्हा परिषद कडे मागणी करणे .ई-निविदा टाकणे व त्यानंतर काम करणे.
| अ.क्र. | कामाचे स्वरुप | अर्जासोबत जोडावयाची कागदपत्रे | सादर करणेसीठी ठिकाण | संपर्क अधिकारी |
| १ | नविन नळ कनेक्शन | १)विहित नमुन्यीतल अर्ज २)पुर्वीचे नळ कनेक्शनची संख्या ३)मागील/ चालु वर्षाची घरपट्टी भरल्याचे पावतीची प्रच | मासिक सभा मंजुरी नंतर | ग्रामपंचायत अधिकारी |
| २ | नळ कनेक्शन बंद करणे | विनिहत नमुन्यातील अर्जसदरच्या नळकनेक्शनवर कराची येणेबाकी नसलेचा पुरावा. पाणीपट्टी भरलेले पावतीची प्रत | मासिक सभा मंजुरी नंतर | ग्रामपंचायत अधिकारी |
| ३ | नळ कनेक्शन दुरुस्ती करणे | सदर व्यक्तीची दुरुस्ती चा अर्ज | मासिक सभा मंजुरी नंतर | ग्रामपंचायत अधिकारी |
| ४ | नळ कनेक्शनची आकारणी घरगुती स्वरुपात करणे | नळ घेणेसाठी अर्ज | अर्ज घेणे | ग्रामपंचायत अधिकारी |
विभागाचे नाव : अभिलेख विभाग
विभागप्रमुख : ग्रामपंचायत अधिकारी ग्रामपंचायत पुनतगाव ता.नेवासा जि.अहमदनगर
- विभागामार्फत देण्यात येणारे दाखले / परवाने : १) जन्म दाखले २) घरपट्टी जमेचे दाखले ३) कागपत्राच्या नकला ४) निराधार असल्याचा दाखला ५) दारिद्र्य रेषेचा दाखला ६) विवाह नोंद दाखला,७) मृत्यू दाखले.
- जन्म,मृत्यु दाखलेः विहित नमुन्यात अर्ज केल्यानंतर २१ दिवसांत दाखला दिला जातो. शासनाचे जन्म मृत्यु नोंदणी नियमाप्रमाणे रुग्णालयात जन्म झाल्यानंतर २१ दिवसांचे आत संबधित रुग्णालयाचे प्रमुख यांनी नोंद पाठविणेआवश्यक आहे. रहाते घरी जन्म झाल्या कुटुंबाचे प्रमुखाने वरीलप्रमाणे नोंद पाठविणे आवश्यक आहे. अशी नोंद न केल्यास १ वर्षापर्यत मा.गटविकास अधिकारी यांचा आदेश आणणे. व १ वर्षानंतर लष्कर कोर्टा मधुन आदेश आणणे.व विलंब शुल्क भरुन नोंद करुन घेणे.
घरपट्टी जमेचे दाखले : विहित नमुन्याच अर्ज करुन दाखला मिळु शकतो.
| अ.क्र. | कामाचे स्वरुप | अर्ज सादर करण्याची वेळ व ठिकाण | मंजुरीची मुदत | संपर्क अधिकारी |
| १ | जन्म दाखला व मृत्यु दाखला | ग्रामपंचायत ऑफिस | नोंद असल्यास १ दिवसात | |
| २ | असेसमेंट उतारा | ग्रामपंचायत अॅफिस | मासिक मिटिंग नंतर |