प्रकल्प व योजना

1:पाणीपुरवठा

मौजे पुनतगाव गावास सार्वजनिक विहिरीवरून पाणीपुरवठा केला जात आहे.त्याकामी गावाच्या पश्चिम बाजूस २ km अंतरावर पाणीपुरवठा विहीर आहे.सदर विहिरीवर सोलर पंप बसवून त्याचे पाणी गावात असणाऱ्या २ टाकी मध्ये टाकून त्याद्वारे गावठाण व वाड्या वस्त्यास पाणीपुरवठा केला जात आहे.सदर योजनेद्वारे गावातील २५०ते २६० कुटुंबाना पाणीपुरवठा केला जात आहे.तसेच सन २०२१ मध्ये ग्रामपंचायत मार्फत आर.ओ.प्लांट देखील बसविलेला आहे.त्यामधून रुपये ५ मध्ये २० लिटर शुद्ध पाणी मिळते त्याचा वापर गावातील ९०% कुटुंब करत आहेत.त्यामुळे गावात आजाराचे प्रमाण कमी होण्यास मदत झालेली आहे.

2:स्वच्छता व घनकचरा व्यवस्थापन

घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन मध्ये गावात सन २०२०-२०२१ मध्ये बंदिस्त गटार हे काम केलेले आहे.त्यामध्ये गावातील ६०% लोकांचे पाणी जोडलेले आहे.तसेच सन २०२४ मध्ये स्वच्छ भारत मिशन अंतर्गत १८ शोषखड्डे केलेले आहे.त्यामध्ये राहिलेल्या कुटुंबाचे पाणी जोडलेले आहे.तसेच घनकचरा व्यवस्थापन करणेकामी ०४ नॅडप खड्डे केलेले आहे.त्याद्वारे घनकचरा व्यवस्थापन केले जाते.

3:रस्ते व प्रकाश व्यवस्था

पुनतगाव गावठाण व वाड्या वस्त्यावर एल.ईडी.स्ट्रीट लाईट बसवून प्रकाशाची व्यवस्था केलेली आहे.गावठाण परीसरात ७० ते ७५ पोल वर एल.ई.डी.लाईट बसविलेले आहेत.तसेच स्मशानभूमी व दफनभूमी परीसरात सौरपथ दिवे बसविलेले आहेत.

4:शाळा व शैक्षणिक सुविधा

मौजे पुनतगाव गावात इयत्ता १ ते ०४ वर्गापर्यंत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आहे.सदर जिल्हा परिषद शाळेचा परिसर अगदी हिरवाईने नटलेला आहे.सदर शाळेची इमारत अगदी सुसज्ज आहे.सदर शाळेत ८० विध्यार्थी शिक्षण घेत आहेत.सदर शाळेची इमारत अगदी सुसज्ज आहे. मुले व मुलांसाठी स्वतंत्र शौचालय व्यवस्था केलेली आहे.शाळेत सी.सी.टीव्ही बसविलेले आहेत.तसेच संगणक आणि पँनल द्वारे विद्यार्थ्यांना शिक्षण दिले जात आहे.तसेच गावाततुकाई विद्या मंदीर नावाचे इयत्ता ५ ते १० पर्यंतचे विद्यालय आहे.त्यामध्ये गावातील आणि लगतच्या गावातील २७५ विद्यार्थी शिक्षण घेत आहे.येथील विद्यालयाच्या परिसर देखील खूप सुंदर आणि स्वच्छ आहेत.

5:आरोग्य सुविधा

पुनतगाव गावात  सुसज्ज असे  प्राथमिक आरोग्य उपकेंद्र आहे.त्यामध्ये निवासी डॉक्टराची व्यवस्था आहे.त्यामुळे कीरकोळ आजारांसाठी गावातील लोकांना गावातच चांगला इलाज मिळतो.तसेच सदर आरोग्य उपकेंद्र मार्फत लहान बालकाचे लसीकरण देखील केले जाते.तसेच आरोग्य उपकेंद्रामार्फत वेगवेगळ्या प्रकारची शिबिरे देखील गावात आयोजित केली जातात.

6:विविध विकास योजना

मौजे पुनतगाव ग्रामपंचायत मार्फत वेगवेगळ्या प्रकारच्या योजनामधून विविध विकास कामे केलेली आहेत.त्यामध्ये

१)१२ वा वित्त आयोग

२)१३ वा वित्त आयोग

३)१४ वा वित्त आयोग

४)१५ वा वित्त आयोग

५)जन सुविधा योजना

६)म.ग्रा.रा.रोजगार हमी योजना (MREGS)

७)मागास क्षेत्र अनुदान निधी (BRF)

८)ग्रामनिधी

९)ग्रामीण पाणीपुरवठा

   अशा वेगवेगळ्या निधी मधून गावात विकास कामे राबविलेली आहेत.

  *विकास कामे*

१)जलजीवन मिशन योजनेअंतर्गत नवीन(MIDC)पाणीपुरवठा योजना -१ कोटी ७० लक्ष

२)स्मशानभूमी विकास करणे-२० लक्ष

३)गावठाण अंतर्गत पाणीपुरवठा पाईपलाईन करणे व नळ कनेक्शन देणे -१५ लक्ष

४)अंगणवाडी इमारत बांधकाम करणे-१० लक्ष

५) आर.ओ.शेड आणि आरो.प्लांट-२,८५,०००/- ६) रस्ते विकास-२० लक्ष

7:प्रधानमंत्री आवास योजना

प्रधानमंत्री आवास योजना हि केंद्र व राज्य पुरस्कृत योजना आहे.यामध्ये केंद्र शासनाच्या ६०% व राज्य शासनाचा ४०%हिस्सा आहे.सदर योजनेमधून लाभार्थ्यांना ग्रामीण भागात घरकुल बांधकाम करणे कामी रक्कम रु १,२०,०००/-मिळतात.घरकुल बांधकामासाठी  महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना मधून २८०००/-पर्यंत रक्कम मजुरीच्या स्वरुपात मिळते.त्यामुळे या राज्यातील अनेक लोकांना आपले स्वत:चे हक्काचे घर पूर्ण होण्यास मदत झाली आहे.आणि भविष्यासाठी मदत होणार आहे.प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत पुनतगाव गावात पुढीलप्रमाणे घरकुले मंजूर झालेली आहेत.

१)PMAY सन २०१७-१८ -०१

२)PMAY सन २०१८-१९-०१

३)PMAY सन २०१९-२० -०९

४)PMAY सन २०२०-२१-०४

५)PMAY सन २०२१-२२-०८

६)PMAY सन २०२३-२४-१२

७)PMAY सन २०२४-२५-९६

        एकूण:-१३१

वरीलप्रमाणे १३१ लाभार्थी यांनी आतापर्यंत सदर योजनेचा लाभ घेऊन घराचे स्वप्न पूर्ण झालेले आहे.

Scroll to Top