मुख्य पान

ग्रामपंचायत पुनतगाव

ग्रामदैवत ओम चैतन्य कानिफनाथ देवस्थान

ता. नेवासा, जि.अहमदनगर

( सन 2023-24 च्या कामगिरीवरुन मुल्यमापन )

स्व. आर. आर. पाटील (आबा)

स्मार्ट ग्राम अभियान

पुनतगाव

सन 2023-24

सरपंच :- श्री.सुदर्शन बाळासाहेब वाकचौरे , मो. नं. 9922998848

उपसरपंच :- श्री.सोमनाथ सखाराम बर्डे, मो. नं. 8668733162

सचिव / ग्रामविकास अधिकारी:- श्री. सतीश दौलतराव मोटे, मो. नं. 9890847452.

Guiding your business through the project

Experience the fusion of imagination and expertise with Études—the catalyst for architectural transformations that enrich the world around us.

ग्रामपंचायत पुनतगाव

ता. नेवासा, जि.अहमदनगर

पुनतगाव हे प्रवरा नदीच्या तिरावर ओम चैतन्य कानिफनाथांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीत वसलेले आहे. पुनतगाव हे गाव नेवासा श्रीरामपूर राज्य महामार्ग वर असून अहमदनगर पासून ८०. कि.मी. व औरंगाबाद पासून ८० कि. मी. वर वसलेले आहे. गावाचे ग्रामदैवत कानिफनाथ देवस्थान असुन गावाच्या दक्षिणेस ग्रामस्थांच्या लोकसहभागातुंन केलेले कानिफनाथांचे भव्य दिव्य पुरातन मंदिर असुन मंदिराच्या भव्यतेमुळे गावाला ऐतिहासिक महत्व प्राप्त झाले असुन वर्षभरात परीसरातील १ लाखाच्या पुढे भाविक दर्शनासाठी येत असतात. कानिफनाथांची यात्राउत्सव पुर्वकालावधीमध्ये गावात दरवर्षी फाल्गुन महिन्यामध्ये मोठा उत्सव भरतो. अतिशय उत्साहाने परीसरातील भाविक यात्रेमध्ये सहभागी होत असुन त्याच कालावधीमध्ये भव्य कार्यक्रम सप्ताहाचे आयोजन केले जाते अनेक समाज प्रबोधन कारांचे प्रवचन किर्तनाचे आयोजन करुन अंधश्रद्धा निर्मुलनाच्या कार्याबरोबर प्रतिथयश अशा एम.पी.एस.सी. / यु.पी.एस.सी.गुणवत्ता प्राप्त तरुण / तरुणींच्या व्याख्यानांचे आयोजन करुन गावातील तरुणांना स्पर्धा परीक्षामध्ये सहभाग घेण्यास प्रोत्साहन दिले जाते. गावावर श्री.कानिफनाथांची कृपादृष्टी असल्याने गावाचे नाव पुनतगाव असे झालेले आहे.

                  कानिफनाथ यात्रा, पंढरपूर पायी दिंडी सोहळा, ज्ञानेश्वरी पारायण, असे नानाविध धार्मिक कार्यक्रमांच्या द्वारे गावात धार्मिक शांततामय सौहार्दाचे वातावरण टिकवुन ठेवण्यास मोलाची साथ मिळते.

                   पुनतगावात सर्व समाज या ठिकाणी असुन हिंदु,मुस्लिम,ख्रिश्चन, सर्वधर्म समभावाने व गुण्यागोविंदाने राहतात.

                पुनतगावचे एकूण क्षेत्रफळ १११३ हेक्टर असून संपूर्ण शेती बागायती आहे. मुख्य पिक उस व कांदा व फळबाग असून त्यामुळे गावामध्ये सुबत्ता नांदत आहे. गावामध्ये १.५ कि.मी.चे कॉक्रिट रस्ते १२०० मीटर बंदिस्त गटार ८५०००/- लिटर पिण्याच्या पाण्याची टाकी, स्ट्रीट लाईट,दोन आरो फिल्टर, भव्य ग्रामपंचायत कार्यालय, वि.वि.का.सेवा संस्था इमारत अशा अनेक विकासाच्या योजना राबविल्या आहेत. महसुल विभागाच्या वैयक्तिक लाभाच्या योजना अपंगाना वयोवृद्धांना दिल्या गेल्याने गावात कोणालाही भिक्षा मागुन जगणाची आवश्यकता भासत नाही. गावा शेजारील बेलपिंपळगाव येथे पशुवैद्यकीय आरोग्य उपकेंद्र असल्याने गावाच्या महसुली भागातील व परीसरातील शेतक-यांनी शेतामध्ये गोठे बांधुन संकरीत गायी म्हशी शेळ्या मुक्तगोठा पद्धतीचा अवलंब करुन पाळलेल्या आहेत. त्यामुळे अनेक ठिकाणी शेताच्या रस्त्यावरच दुध संकलन केंद्राच्या सुविधा निर्माण झाल्या आहेत त्याही माध्यमातुन खुप मोठी रोजगार निर्मिती करण्यास व दुग्धजन्य पोषण आहार गावातील कुटुंबाना मिळत असुन ग्रामस्थांचे आरोग्य उत्तम राहण्यास मदत होत असुन तसेच दुधांचे संकलन करुन दुध थंड करुन निर्यातीस प्रोत्साहन देण्यात आले आहे. नवीन एक ४५०००/- लिटर पिण्याच्या पाण्याच्या टाकीचे काम पूर्ण झाली असून नवीन पाईप लाईन वितरण व्यवस्थेचे काम नुकतेच झालेले असुन जुन्या व नवीन पाण्याच्या टाकीमधुन या वितरण नलिकेद्वारे गावातील प्रत्येक कुटुंबाला वैयक्तिक नळ कनेक्शन दिलेले आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्याचे काम स्वयंपूर्ण झालेले आहे.

              ग्रामपंचायतीने जिल्हा परिषद राज्य शासनाच्या माध्यमातून गावात अनेक सुविधा निर्माण केल्या आहेत. घनकचरा व्यवस्थापन व सांडपाणी व्यवस्थापन गावामध्ये सावलीसाठी वृक्षारोपन करुन ओटे बांधकाम केले आहेत, आरोग्य सुविधा, बचत गट, शिक्षण सुविधा, निर्माण केल्या असून नागरिकांना याचा लाभ होतो. गावातील संपूर्ण अंतर्गत रस्त्यांचे कॉक्रीटिकरण करुन गावामध्ये कुठेही दल दल होणार नाही याची काळजी घेतली असुन गाव चोहोबाजुने इतर गावांना व शहरांना बारामाही डांबरीकरण झालेल्या रस्त्याने जोडले असून त्यामुळे गावात चांगली बाजारपेठ निर्माण झालेली आहे. गावा शेजारील जायगुडे आखाडा येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्र अंतर्गत त्याद्वारे नागरिकांना मोफत आरोग्य सुविधा पुरविल्या जात आहेत. एकात्मिक बालविकास प्रकल्प असल्याने महिला बचत गटास कार्य करण्यास चांगली संधी मिळाली आहे. गावातील बचत गट प्रगतीपथावर असून याद्वारे महिलांनी रोजगार निर्मिती केली आहे. गावाच्या विकासामध्ये महीलांचा सहभाग महत्वाचा मानुन श्री.सुदर्शन बाळासाहेब वाकचौरे यांची सरपंच पदी नियुक्ती करुन ग्रामस्थांनी महिलांच्या रोजगार, आरोग्य, शिक्षण या बाबीकडे त्या वैयक्तिक लक्ष देतात त्यामुळे गावातील महिला बचत गटांना त्याचं कार्य करण्यासाठी सरपंच यांची मदत होते .महिला ग्रामसंघ व जागृती महिला ग्रामसंघ यांना इमारत उपलव्ध करून दिली आहे.

                       सरपंच श्री.सुदर्शन वाकचौरे यांचे नेतृत्वाखाली व उपसरपंच श्री. सोमनाथ बर्डे सर्व ग्रा.पं सदस्य  तसेच ग्रामविकास अधिकारी श्री.सतीश मोटे यांचे सहकार्याने तसेच ग्रामस्थांच्या सहभागाद्वारे गावात उत्तम प्रकारचे काम चालू असून गावात नाविन्यपूर्ण उपक्रम राबविले जात आहेत. हागणदारी मुक्त गाव, गावातील सर्व गटारी बंदिस्त असल्याने गावातील कुठेही उघड्यावर घाण झालेली दिसत नाही व दुर्गंधी पसरत नाही. गावात सर्व धर्माच्या स्मशानभुमी व दफनभुमी आहे. त्या स्मशान –दफनभुमीवरील मोकळ्या जागेवर वृक्षारोपन केल्याने पर्यावरण संवर्धनाच्या कामामध्ये गावाने उत्तम असा सहभाग नोंदवला आहे. असे अनेक उपक्रम राबवण्यात गावाने खुप मोठा टप्पा पार पाडला असला तरीही “आमचे बळ आमची एकी अजुन बरेच काम बाकी.. या उक्ती प्रमाणे स्व. आर आर (आबा) पाटील सुंदर गाव पुरस्कार योजनेच्या बक्षीसाची धाप आमच्या पाठीवर पडल्यास आमच्या गावाच्या उर्वरीत ग्रामविकासाच्या स्वप्नपुर्तीस खुप मोठा हातभार लागणार लागणार आहे. त्यामुळे स्व. आर आर (आबा) पाटील सुंदर गाव पुरस्कार या अभियानामध्ये भाग घेण्यास आंम्हाला मनस्वी आनंद होत आहे.

Francesca Piovani

Founder, CEO & Architect

Rhye Moore

Engineering Manager

Helga Steiner

Architect

Ivan Lawrence

Project Manager

Enhance your architectural journey with the Études Architect app.

  • Collaborate with fellow architects.
  • Showcase your projects.
  • Experience the world of architecture.
White abstract geometric artwork from Dresden, Germany